Wednesday, March 11, 2009

टॉमची आई

प्रिय सलोनी .... टॉम म्हणजे माझा boss ! तसे भलतेच जालिम प्रकरण आहे। ६०-६५ वर्षांचा, अतीशय धूर्त, धोरणि, बुद्धिमान आणि कंपनीच्या राजकारणात मुरलेला माणुस आहे तो। मुळचा जर्मन परन्तु मागच्या ३-४ पिढ़्यांपासून अमेरिकेत स्थाईक झालेल्यान्पैकी एक आहे। जर्मन लोक तसे बोलायला अतीशय मोजके, काहीसे ताठ परन्तु अतीशय शिस्तबद्ध असतात। अमेरिकेत येउन हां समाज पूर्णतः अमेरिकन झाला आहे। जर्मनी या आपल्या मुळच्या देशाबद्दल प्रेम असते परन्तु अमेरिका हाच आता स्वीकारालेला देश झाला आहे यांचा। तसे जर्मनच नाही तर सर्वच देशांच्या लोकांबद्दल असे म्हणता येइल। असो... तर हां टॉम ५ वर्षांपासून माझा boss आहे। सुरुवातीला रुक्ष असलेला टॉम मागील १-२ वर्षात भलताच बदलला आहे। सलोनिच्या भावी आगमनाची बातमी त्याला ताबडतोब कानावर घातली होती। तेव्हापासूनच तो कळत नकळत मला जपत जपतच काही काम सांगतो। इथे family म्हणजे कौटुम्बिक बाबींमध्ये कम्पनिमधिल वरिष्ट खूपच सहकार्य करणारे असतात। त्यामुळे त्यानेही मला अगदी वाटेल तेव्हा वाटेल तिथून काम करण्याची मुभा दिली आहे। इथे नोकर चाकर नसतात ... नातेवाईक किंवा आप्तेष्टांचा आधार कमी असतो आणि सहसा नवरा बायको दोघेही नोकरी करतात अशीच परिस्थिति सर्वांची असते। त्यामुळे काही कौटुम्बिक अड़चण आली तर सहसा कामाच्या वेळात सुद्धा घराची काम आटोपली तर चालते। सहसा तुम्हाला दिलेले काम तुम्ही पूर्ण करावे अशी अपेक्षा असते। लवकर पूर्ण केले तर उरलेल्या वेळात आपण काहीही करू शकतो।

असो ... तर आज टॉम अगदी रंगात आला होता। याची आई अजूनही ठणठणीत आहे। आईचा विषय काढला की हां रुक्ष माणूस अगदी जिवंत होतो। इतके दिवस मला माहीत होते की टॉम ची आई ८०-८५ वर्षांची आहे। परन्तु आजच्या ग़प्पान्मध्ये कळले की टॉमची आई "थोर" आहे। ८०-८५ वर्षांची ही आजी अजूनही कार्यरत आहे। त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघाची मागील १५ वर्षे अध्यक्ष आहे। स्वतःच्या ६ नातवंडान्ना प्रत्येक आठवड्यात स्वतःच्या हस्ताक्षराचे १ पानी पत्र लिहून पोस्ट करते। अमेरिकेत भारतीयांची सहसा अशी कल्पना असते की अमेरिकन कुटुंब व्यवस्था अगदी ढासळलेली आहे। काही प्रमाणात ते खरेही आहे। परन्तु कुटुम्बवत्सल एकमेकांसाठी जीव देणारी, अगदी अनोळखि व्यक्तिन्साठी निरपेक्ष मदत करणारी ही खूपच उदाहरणे आहेत। असो ॥ परन्तु टॉम ची आई अगदी नेटाने सर्व कुटुम्बाला धरून आहे। ३०-४० वर्षांची तिची नातवंडे आवर्जून तिला भेटायला जातात। आजीची पत्र मित्रांना वाचून दाखवतात। Grandama's movie reviews नावाची वेबसाइट चालू करण्यासाठी धडपड करतात कारण आजीने सिनेमा पाहिल्या पाहिल्या पहिल्यांदा नातवंडान्ना सांगितले असते। ८०-८५ व्या वर्षी ही आजी एकटी रहते। बोलिंग करते। कंप्यूटर शिकते। फ्रांस मधल्या पतवन्डान्ना इमेल्स लिहिते।

मी मनोमन थक्क झालो। तशी साधी साधी माणसे भेटतात आयुष्यात ... परन्तु कधी कधी त्यांना खूप खोली असते। जवळ गेल्याशिवाय जाणवत नाही। तसेच आपल्या मनामध्ये खूप गैरसमज असतात। मन मोकळे नाही ठेवले तर नविन कल्पना आत येणारच नाहित आणि गैरसमज दूरच होणार नाहित।

कुठेतरी मी भारतातील ज्येष्ट नागारिकांशिही तुलना करू लागलो। आपल्याकडे नव्या पिढिबरोबर चालणारे लोक कमी दिसतात। नाही असे नाही। परन्तु नक्कीच कमी। "परिवर्तन ही संसार का नियम है" असे सान्गनार्या भागावाद्गीतेला मानणारे आपण लोक ... परन्तु आपल्याकडे बदल तसा बराच हळु येतो... असो ... त्याबद्दल पुन्हा कधीतरी....

4 comments:

Anonymous said...

छान जमलाय लेख.. अरे तुझ्या सलोनिचा फोटो ( झाल्याबरोब्बर )मात्र पोस्ट कर बरं कां.. कारण तुझ्या प्रोफाइलमधे तुझी काहिच माहिती नाही.. सलोनिला पहायची आम्हाला ( मी + माझी सौ.) पण उत्सुकता आहे बरं कां... शुभेच्छा!!

बाल-सलोनी said...

@kayvatelte

फोटो अगदी नक्की upload करेन। आम्ही आतुर झालो आहोत।
तुमचा ब्लॉग देखिल पहिला। केवढे लेखन केले आहे तुम्ही! अगदी हाडाचे लेखक दिसता आहात। मला १ पान लिहायला १ ते १ १/२ तास लागतो। परन्तु तरीही मराठीत लिहिण्यात आनंद वाटतो।

Mahendra Kulkarni said...

अहो, काही फार वेळ लागत नाही टाइप करायला. .. बरहा डाउन लोड करुन घेतलंय. माझी मराठी अन इंग्रजी ची स्पिड सारखीच आहे.. म्हणुन सोपं जातं.. ह्याचं खरं श्रेय माझ्या अमेरिकेतिल बहिणिला, तिला मी मराठी मधे चाट केलेलं आवडतं, त्यामुळे स्पिड वाढली टायपिंग्ची..
माझ्या मते तुझं वय साधारण माझ्यापेक्षा निम्मं असावं म्हणुन एकेरी उल्लेख केलाय.. गैरसमज नसावा.. शुभेच्छांसहित...

बाल-सलोनी said...

शतश: धन्यवाद!! मला इतके दिवस कसे काय हे दिसले नाही इन्टरनेट वर!! एकेरी उल्लेखाला हरकत नाही. लोभ असावा.