Thursday, March 12, 2009

स्लमडॉग मिलिओनेअर

सलोनिबाई ..... इकडे अमेरिकेत येउन मी जितके हिन्दी आणि मराठी चित्रपट पाहिले आहेत ते मी भारतात सुद्धा कधी पाहिले नव्हते। भारतात मी इन मीन ४-५ हिन्दी चित्रपट टॉकीज ला जाऊन पाहिले असावेत। मराठी तर एक सुद्धा नसेल ... कदाचित बाल शिवाजी (आनंद आगाशे)च फक्त अपवाद। परन्तु इकडे अमेरिकेत येउन हिन्दी मराठी चित्रपट आवडू लागले। मराठी गाणी विशेषतः ! आणि सध्याच्या सा रे ग म प little champs ने तर वेड लावले। आता मात्र भारतात गेलो की सहसा टॉकीज ला जाऊन मराठी चित्रपट पाहतो। जत्रा धमाल होता। वळु तर थोर होता। वळु श्रीकांत (यादव) बरोबर पाहिला। त्यामुले अगदी चित्रपट कसा बनवला इत्यादि गोष्टींची सुंदर माहिती कळलि।

असो .... इकडे अमेरिकेत मराठी हिन्दी चित्रपट पहायचे म्हणजे ... चकटफु इन्टरनेट वर घर बसल्या पहायला मिळतात। तर १ महिन्यांपूर्वी स्लमडॉग मिलिओनेर पहिला। चित्रपट अफलातून आहे। पाश्चिमात्य लोकांची कुठलीही कृति अफलातूनच वाटते कारण त्यामागे कष्ट ओतलेले जाणवतात। दृश्ये, संवाद, नेपथ्य सगळीकडे बारीक बारीक गोष्टींचा विचार केलेला दिसतो। थातुर मातुर काम करणे हां आपला भारतीयांचा गुणधर्म। चाणक्य सारखी मालिका एखाद दुसरीच। दादा १० वर्षांपूर्वी एकदा मला म्हणाले होते ..की भारतीय लोकांकडे पाश्चिमात्य लोकांसारखी शिस्त आणि कष्टाळुपणा दिसेल असे एकच क्षेत्र आहे ते म्हणजे शास्त्रीय संगीत आणि नृत्य। मला वाटते ते बव्हंशी खरे आहे। नाही तर महात्मा गांधींवर चित्रपट काढण्यासाठी रिचर्ड अॅटनबरो कशाला पाहिजे? आपण का काढू शकत नाही? सावरकर शिवाजी महाराज यांच्या चरित्राला न्याय करेल असा चित्रपट अजून निघायचाय। आपण वाट बघू।

परन्तु तोपर्यंत कमीत कमी केवळ तांत्रिक दुष्ट्या चांगला आहे आणि एकंदरीत उत्तम दिग्दर्शन पटकथा आहे म्हणुन आपल्या गरिबीचा बाजार, सामाजिक प्रश्नांचे भांडवल, हिंदूंची अवहेलना, मुंबई पोलिसांवर अकारण टीका आणि मुस्लिमांची न होणारी गळचेपी दाखवणार्या चित्रपटाला ऑस्कर कसा काय मिळतो याचा थोड़ा विचार करायला हवा। किंबहुना ऑस्कर मिळण्याचे हेच निकष आहेत की काय असे वाटते।

फोड़ा आणि झोडा हे तंत्र वापरणार्या इन्ग्रजान्चीच औलाद हे असे ऑस्कर बहाल करू शकते। प्रतेक वेळी भारताला नावे ठेवानार्याच लोकांना पुरस्कार का मिळतात। अरुंधती रॉय, तो हैदराबादचा कुणी शहाणा (अरविंद अदिगा) यांच्या पेक्षा आपल्याकडे लेखक चांगले झाले नाहित का? की सत्यजित राय, राज कपूर, गुरुदत्त याचे चित्रपट इतके चांगले नव्हते?

भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात उत्पादन अगदी कमी होते, ९९% कृषिप्रधान देश होता, आयुर्मान ५०-५५ वर्षे होते, गरीबी ७०% च्या पुढे होती। आज भारत आपले उपग्रह सोडतो अवकाशात, शेती अर्थव्यवस्थेच्या ३०% च्या आसपास आहे, आयुर्मान वाढत आहे आणि गरीबी २५% आहे। दर वर्षी एक ऑस्ट्रेलिया जन्माला घालणार्या देशाने हे साध्य करायचे म्हणजे काही कमी नाही। बरे त्यातुनही चीन आणि पाकिस्तान सारखे शेजारी आहेत। आणि त्यांना प्रोत्साहन देणारे पश्सिमात्य राष्ट्र (अमेरिकेसकट) आहेत। आज कश्मीर प्रश्न नसता तर भारत अजून १०० पावले पुढे असला असता। पंजाबचा दहशतवाद नसता तर अजून २०० पावले पुढे असला असता। आज देखिल नक्शल वाद्याना हत्यारे कुठून मिळतात? आणि का?

वस्तुस्थिति ही आहे की आपण भाबडे आहोत। या भाबडेपणानेच आपला घाट केला आहे शतकानुशतके। शिवरायांचे हेच तर महत्व! सावरकरांच्या भाषेत "ही युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी" अशी शिवरायांची कूटनीति होती। २१ वे शतक भारत आणि चीनचे असणार आहे यात शंका नाही। आणि म्हणुनच आपल्या प्रगतित खीळ घालायला अनेक जण उत्सुक आहेत। कधी पाकिस्तान ला साह्य, कधी अतिरेक्यान्ना उत्तेजन, कधी नक्शलवाद्यान्ची भलामण तर कधी आर्थिक गळचेपी, आणि अगदी काही नाही तर भारत विरोधी गोष्टीना प्रोत्साहन। भारतद्वेशाची आणि भारताला रोखण्याची ही अशी नानाविधा साधना आहे।

स्लमडॉग - चित्रपट चांगलाच आहे... परन्तु आपल्या गृहछिद्रान्चे परकियान्नी प्रदर्शन मांडावे आणि आम्ही टाळ्या वाजवाव्यात हे मानसिक गुलामगिरी किंवा दिवाळखोरिचे लक्षण आहे।

सलोनी ... भारतीय संस्कृति वसुधैवकुटुम्बकमता सांगते तशीच निळ्या कोल्ह्याची गोष्टही सांगते। दोन्ही ही गोष्टी खर्या आहेत। परन्तु भाबडेपणा उपयोगाचा नाही। त्याने स्वार्थ ही बुडेल आणि परमार्थ ही साधणार नाही। परवशतेचे धुपाटणे मिळेल।

3 comments:

Anonymous said...

आज माझ्या ब्लॉग वर पण तुझी सलोनी आहे बघ!! चेक कर ब्लॉग माझा..

Saloni said...

धन्यवाद! तुमचा पोस्ट वाचला ... मी समजु शकतो तुम्ही जे लिहिले आहे ते. मुलीन्च्या घटत्या जन्म दराबद्दल म्ह्णाल तर मला वाटते त्यावर एकच उत्तर आहे - मुलीन्नी आत्म्निर्भर होणे.
तुमच्या ब्लोग ला subscribe कसे करायचे?
ब्लोग वरची छायाचित्रे खूप आवड्ली!

Anonymous said...

मी तर गुगल रिडर ला फिड घेउन आवडीचे ब्लॉग्ज , साइट्स वाचतो.. हि लिंक आहे रिडरची..http://www.google.co.in/reader /