Sunday, February 1, 2009

(अमेरिकन) फूटबॉल

आज इकडे मोठा धमाकेदार दिवस होता। अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल। अमेरिकेत प्रत्येक मोठ्या शहरात फुटबॉल खेळणारी १ मुख्य टीम असते। (कधी कधी जास्त ही असतात।) अश्या सर्व टीम्स चा हां यांचा विश्वकरंडकच जणू। यावर्षी फिनिक्स आणि पिट्सबर्ग या दोन शहरातील टीम्स मध्ये अन्तिम सामना रंगला।

इथल्या कुठल्याही नव्या भारतीय माणसाला हां खेळ ही अगदी विचित्र वाटेल। या खेळामध्ये आणि भारतात आपण ज्याला फुटबॉल म्हणतो त्यात काहीच साधर्म्य नाही। पहिली गम्मत म्हणजे यात पायाने बॉल मारत नाहीत। दुसरे असे की या खेळाचा चेंडू गोल आकाराचा नाही !! फुटबॉल चे वरचे टोक आणि खालचे टोक खेचले तर फुटबॉल जसा दिसेल साधारण तसा हां चेंडू असतो। उद्देश हां की त्यामुळे चेंडू हवेतुनच फेकता यावा। अश्या आकाराचा चेंडू जमिनीवर पडल्यावर वाटेल तसा उसळतो अणि तिसरी गम्मत अशी की हां खेळ थाम्बुन थाम्बुन खेळला जातो। एक वेळी एक टीम कड़े चेंडू असतो। त्यांना ४ चान्स मध्ये तो चेंडू घेउन ४० यार्ड पुढे जायचे असते। फक्त एकच अड़चण असते की दुसऱ्या टीम चे अगदी रानदांडगे खेलाडू तुम्हाला वाटेल तसे आडवे पाडू शकतात। बॉल घेउन पळणार्या माणसाला जमिनीवर लोळवले की तुमचा एक चान्स संपला। आणि असे करीत तुम्ही जर दुसर्या टीम च्या सीमारेशेपलिकडे गेलात तर दुसर्या टीम वर ६ गुण चढतात आणि अजून एक किक मारून जर बॉल तुम्ही २ पोल्स च्या मधून घालवला तर अजून एक गुण।

एकंदरीतच अमेरिकन माणसाला हातांचे जबरदस्त आकर्षण आहे। फुटबॉल, बास्केट्बोल, किंवा अगदी बेसबॉल हे सगळे खेळ इथे हातांनी खेळायचेच आहेत।

असो तर ...आज हां असा फायनल चा दिवस होता। दरवर्षी या दिवशी जाहिरातिंची आतिशबाजी असते। या दिवशी तिकिटे १००० डॉलर्स च्या पुढेच असतात। मोठ मोठ्या कंपन्या त्यांच्या अतीशय रंजक आणि महत्वाच्या जाहिराती लक्षावधि डॉलर्स मोजुन याच दिवशी टीव्ही वर सादर करतात। या वर्षी मंदी मुळे पैशाचा भपका इतका नव्हता। गर्दी नेहेमी पेक्षा कमी होती। .... परन्तु तरीही अतीशय रंगतदार खेळ झाला।

एरिजोना ची टीम म्हणजे अगदीच नशीबवान म्हणुन इथपर्यंत आली असे सर्वांचे आधी मत होते। परन्तु अरिजोना ने दाखवून दिले की ते किती चांगले खेळाडु आहेत। अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत पारडे वर खाली होत होते। परन्तु अखेरिस पीट्सबर्ग २७-२३ ने जिंकले।

By the way, obama was supporting Pittsburg! This guy is a rockstar president. तो काय करतो आणि काय नाही करत सगळ्या जगाला त्याचे कौतुक। काल सकाळी मी आईला फ़ोन केला तर ती पण मला म्हणते की ओबामा ची बातमी लागली की लगेच कान टवकारते। आहे की नाही मजा। ९००० मैल दूर असलेया ६५ वर्षांच्या बाईला ओबामा काय म्हणतोय याचे नवल!!

उद्या नक्की ओबामावरच लिहिन। प्रॉमिस!!

No comments: