सलोनिबाई आज माझे काही खरे नाही। आज सकाळी सकाळी सिद्धार्थला शाळेत जायला उशीर झाला म्हणुन मी त्याला कपडे घालत होतो। तेव्हा अचानक माझी पाठ अवघडलि। अमेरिकेच्या तशा सुखासीन आयुष्यात वजन ४० पाउंड ने कधी वाढले ते कळलेच नाही। भारतातून आलो तेव्हा अगदी व्यायाम करून निरोगी असलेला मी इथे येउन पिज्जा, आइस क्रीम खाऊन अगदीच जाड होत गेलो। इतकेच नाही तर व्यायाम पूर्णपणे सुटला। त्यात दिवसभर ऑफिस चे काम म्हणजे तसे काहीच शारीरिक कष्ट नाहित। या सर्वांचा परिणाम म्हणुन माझे पाठीचे दुखणे सुरु झाले। अणि हे दुखणे इतके बळावले की एक दोनदा तर मी पूर्ण ९० अंशात वाकलो गेलो होतो। मला वाटते माझी कदाचित थोड़ी जास्तच गंभीर परिस्थिति असावी। परन्तु बर्याच तीशीतील व्यावसायिकांची हीच परिस्थिति असावी।
असो। त्यामुले आज घरून च काम केले। एकदा घरी राहिले की खरे तर माझे तरी इतके चांगले काम होत नाही। त्यातच आज सोनालीची ग्लूकोज ची टेस्ट होती। तिला पहिल्यांदा एक ग्लास भरून ग्लूकोज चा पाक (syrup) प्यायला दिले। त्यानंतर ४५ मिनिटे थाम्बायचे। आणि मग त्यानंतर सोनालीचे रक्त तपासणीसाठी घेतले गेले। या ४५ मिनिटात गर्भार स्त्रीने किती ग्लूकोज पचवले हे तपासले जाते। त्यासाठी रक्त तपासणी! जर कमी ग्लूकोज पचवले गेले तर त्या स्त्रीला मधुमेहाचा धोका असतो। आणि त्यामुले बाळाच्या जन्माच्या वेळी गुंतागुंतीची परिस्थिति निर्माण होऊ शकते। तर आता पाहू कसे काय होते आहे ते। तशी तुझी आई बरीच अभ्यासू आणि काळजीखोर आहे। त्यामुले तिला या सर्व गोष्टींची अद्ययावत माहिती असते आणि ती काळजी घेत असते।
मी तिच्याबरोबर दवाखान्यात गेलो होतो पण तरीही माझे ऑफिस चे काम चालू होते। आजकाल मला ऑफिस मधून ब्लैक बेरी हा फ़ोन मिळाला आहे। त्यामधे इ-मेल , फ़ोन, महत्वाची काही सॉफ्टवेर सर्व काही असल्यामुळे मी लोकांना इमेल्स केल्या, फ़ोन केले - घेतले, काही काही फायली वाचल्या आणि दुरुस्त केल्या इत्यादि इत्यादि। अगदी ओबामा सुद्धा ब्लैक बेरी चा चाहता आहे। अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर इकडच्या त्याच्या सुरक्षा विभागाने त्याला ब्लैक बेरी वापरायला मनाई केली। कारण काय तर त्यावरची माहिती सुरक्षित कशी ठेवायची याची त्यांच्याकडे उपाय योजना नव्हती। या आधीच्या कुठल्याच अध्यक्षांनी ब्लैक बेरी वापरला नव्हता। पण मग ओबामा ला जर वापरायचा असेल आणि वापरता येत नसेल तर काय उपयोग अमेरिकेचा अध्यक्ष असण्याचा? काही तरी करून त्याने त्याच्या सुरक्षा विभागाला पटवले। आणि आता अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा ब्लैक बेरी वापरतो!! मजा येते ब्लैक बेरी वापरून .... इ-मेल, इन्टरनेट, फ़ोन, अगदी गेम्स सुद्धा... !! हे म्हणजे आम्हा पुरुषांसाठी अगदी "उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया!! जप तप अनुष्ठाने.. आनंदवनभुवनी!!"
No comments:
Post a Comment