Sunday, February 22, 2009

As Time Goes By

२० फेब्रुअरी २००९

आज दादांची ईमेल आली। तशी बर्याचदा येते। परन्तु आजच्या ईमेल च विषय काही वेगळा होता। नेहेमी आम्ही राजकारण, अर्थकारण, संरक्षण या विषयांमध्ये रमतो। आज मात्र दादांनी "बदल" अर्थात "change" या विषयावर ईमेल लिहिली - किम्बहुना forward केली। या ईमेल मध्ये जगात होणार्या बदलांवर कुतुहल आश्चर्य भीती आणि व्यथा व्यक्त केली होती। ईमेल मध्ये एक काल्पनिक आजोबा आपल्या नातवाशी जगातील बदलांबद्दल बोलतात। नातवाला जगातील सर्व नवे शोध स्वाभाविक वाटत असतात। आजोबाच्या मनात मात्र काही तरी गमावाल्याची खंत असते।

खरेच ... आम्ही अमेरिकेत आल्यापासून भारतात किती बदल झाला आहे! IT क्षेत्र अगदी फोफावले आहे। रस्ते रुंद वाटतात। शहरान्मधुन भारतातील सर्व राज्यातील लोक दिसू लागले आहेत। सगळिकडे मॉल्स दिसू लागले आहेत। फ्लैट स्क्रीन TVs आले आहेत। अलिकडची पिढी खूपच आत्मविश्वासपूर्ण वाटते आहे। त्यांना काय हवे आहे हे त्यांना नक्की माहिती आहे! एक ना अनेक! आणि अमेरिकेतही ... आम्ही आलो तेव्हा इन्टरनेट इतके सर्वदूर नव्हते ... डिजीटल टीवी नव्हते... गैस (पेट्रोल) १ ते १.५ डॉलर्स ला होता। बघता बघता अमेरिकेतील राहणीमान प्रचंड सुधारले। मला वाटते की जागतिकिकरणाचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा हां परिणाम असावा। अरे हो विसरलोच ... अगदी iPOD आणि डिजीटल कैमेरेसुद्धा नव्हते। आता कल्पना सुद्धा करवत नाही ... ईमेल, आईपॉड, डिजीटल कैमरे ... कसे काय आपण राहिलो असू पूर्वी!
परन्तु या बदला ला स्वीकारणे सोपे नाही ... विशेषतः चाळीशिच्या पुढच्या लोकांना। किम्बहुना सर्वांच्या च आयुष्यात एक टप्पा येतो की त्यानंतर फार बदल नको वाटू लागतात। स्थैर्य हवे हवेसे वाटू लागते। ओळखिच्या वस्तूंमध्ये जास्त गोडी वाटू लागते। इतकेच नाही, तर अनोळखी गोष्टींची भीती वाटू लागते। भूतकाळातिल गोष्टींमध्ये रमण्याची वृत्ति वाढते।

अमेरिकेतील लोकान्मद्ये शंभर दोष असतील ... परन्तु भुतकाळामध्ये रमणे हां त्यातील एक मुळीच नाही। अमेरिकन माणूस हां सदैव भविष्याकडे पाहणारा आहे। काल काय घडले याचा अवाजवी विचार त्याला रुचत नाही। अमेरिकेच्या यशाचे हे एक महत्वाचे कारण आहे। अमेरिकन माणसाची (किंबहुना पाश्चात्य ) विचारसरणीच मुळी भविष्याभिमुख आहे। इतिहासात ते रमत नही। उद्याचा दिवस आजच्या पेक्षा अधिक चांगला असेल अशी आशा आणि ते करून दाखवण्याची जिद्द त्यांच्या मध्ये दिसते। भारतीय माणूस कालाकडे एक चक्र या नजरेने पाहतो। सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा परत घडतात असे आपले मन मानते। अगदी जन्म मृत्यु सुद्धा!

मला वाटते दोन्ही दृष्टिकोण खरे आहेत। केवळ एकाच दृष्टिकोनाला चिकटून राहणे घातक आहे। कालाकडे फक्त पुनरावृत्ति च्या दृष्टिकोनातुनाच पाहण्यातुन दैववाद बळावतो प्रगति खुंटते। त्या उलट कालाकडे फक्त बाणाच्या दृष्टिकोनातून पाहण्यातुन जीवनातील स्थैर्य आणि शान्ति निघून जातात।

जीवन हे विरोधाभासान्ना संतुलित करत करतच जगण्यात आनंद आहे.....

असो ... आज मी ईस्ट कोस्ट ला काही मीटिंग्स करता गेलो होतो। येता येता याच विषयावर एक सुंदर गाने ऐकले .... मला खुपच आवडले ... सलोनी तू मोठी झाल्यावर तुला कळेल आणी आवडेलही... मला खात्री आहे... गाणे तसे प्रणयशील आहे ... परन्तु त्यातील आशय व्यापक आहे। भोवताली घडनार्या बदलान्मध्ये देखिल काही गोष्टी बदलत नाहित ... या अर्थाचे आहे...

AS TIME GOES BY
--------------------
You must remember this
A kiss is still a kiss
A sigh is just a sigh
The fundamental things apply
As time goes by


And when two lovers woo
They still say I love you
Oh that you can rely
No matter what the future brings
As time goes by

Moonlight and love songs
Never out of date
Hearts full of passion
Jealousy and hate
Woman needs man
And man must have his mate
That no one can deny

It's still the same old story
A fight for love and glory
A case of do or die
The world will always welcome lovers
As time goes by

No comments: