सलोनीराणी
दोन आठवड्यांपूर्वी एक चित्रपट पाहिला. अवतार अर्थात ऍव्हंटार ... या अमेरिकन लोकांना सरळ शब्दोच्चार जमतच नाहीत. ऍ कुठेतरी आलाच पाहिजे. शरद तळवलकर असे साधे नाव वाचायले सांगीतले तर फेफरेच येईल यांना!!
असो .. अवतार हा मराठी/संस्कृत शब्द आहे. जेव्हा जेव्हा जगावर संकट येते तेव्हा परमेश्वर कुठलेतरी रूप धारण करुन पृथ्वीवर जन्म घेतो आणि मनुष्यजातीला संकटातुन वाचवतो अशी कल्पना. या चित्रपटाच्या कथानकाचा गाभा हाच आहे. जेक सली हा पाय गमावलेला सैनिक नवे पाय लाऊन घेण्यासाठी लागणारे पैसे कमावण्यासाठी एका शास्त्रीय प्रयोगामध्ये भाग घेतो. त्याला एका नवीन ग्रहावर (पॅण्डोरा) जाऊन तिथल्या एका उद्योगासाठी एक कामगिरी पार पाडायची असते. कामगिरी अशी की स्थानिक लोकांकडे अनऑब्टेनिअम नावाचे एक मूल्यवान द्रव्य किंवा धातु असतो तो स्थानिक लोकांमध्ये मिसळुन जाऊन त्यांच्याकडुन हिरावुन घ्यायचा. स्थानिक लोक अतिशय उंच काटक आणि निळ्या रंगाचे असतात. तेव्हा त्यांच्यासारखी दिसणारे शरीरे शास्त्रज्ञ तयार करतात. विशिष्ट तंत्रज्ञान वापरुन जेक सुली त्या दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो - तस्मात् चित्रपटाचे नाव अवतार! परंतु अवतार घेऊन जर त्या स्थानिक लोकांना लुटणार असेल तर मग तो अवतार कसला? त्यामुळे जेक सली हा अखेरिस स्थानिक लोकांच्या बाजुने लढतो आणि त्यांना लुबाडण्याचे प्रयत्न हाणुन पाडतो.
चित्रपट सुंदरच आहे. त्रि-मिती दृष्ये आणि संगणाकाची कमाल आहे. तसेच टर्मिनेटर, एलिअन्स, अबिस आणि टायटॅनिक सारखे अतिप्रसिद्धच नव्हे तर नवीन दिशा देणारे चित्रपट काढणाऱ्या जेम्स कॅमेरॉन चा हा चित्रपट... त्यामुळे चांगलाच असणार. परंतु तेवढेच असते तर या लेखाचे प्रयोजन नव्हते. ९-१-१ च्या घटनेनंतर अमेरिकन चित्रपट हे केवळ करमणुकप्रधान राहिले नाही आहेत. त्यांमध्ये बऱ्याचदा सूप्त अथवा उघड संदेश दडलेले असतात. ते समजुन घेण्यासाठी हा प्रपंच.
९-१-१ नंतर जनमत खवळलेले होते. शस्त्रे तयार करणाऱ्या कंपन्यांना युद्धाची चांगली संधी होती. इस्रायल समर्थकांना चांगली संधी होती की अरब राष्ट्रांचा काटा काढावा (नाहीतर टोक तरी मोडावे!). ऑईल कंपन्यांना संधी होती की अस्थिरतेचा फायदा घेऊन तेलाच्या किमती भरमसाठ वाढवुन नफा कमवावा. रिपब्लिकन पक्षाला चांगली संधी होती की युद्धे करुन आपले बस्तान चांगले बसवावे. आणि सर्व अमेरिकन उद्योगांना चांगली संधी होती की युद्धासाठी आणि नंतर सामग्री पुरवुन पैसे कमवावेत. जे उद्योग हे काहीच करत नव्हते ते रिपब्लिकन पक्षामार्फत "अमेरिका खतरेमे" जा एकीकडे जयघोष करत उद्योगांना पोषक (आणि सामान्यांना जाचक) असे नियम शिथील करत होते. या सर्वाचा परिपाक म्हणुन अखेरिस अफगाणिस्तान आणि नंतर इराक वर अमेरिकेने हल्ले केले आणि ती युद्धे अजूनही चालू आहेत. त्यामागचे सूप्त उद्देश वर नमूद केल्याप्रमाणे अजूनही कायम आहेत.
बऱ्याचदा असे म्हटले जाते की अमेरिकेने तेलासाठी इराक युद्ध केले. आणि ते खरे असले तरीही अर्धसत्यच आहे. खरी गोष्ट ही आहे वर म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टींचा तो एक परिपाक होता. जग हे खूप गुंतागुंतीचे आहे. तिथे एक खलनायक आणि एक नायक आणि एक नायिका नाही आहे. अनेक पात्रे आणि त्यांचे अनेक उद्देश असतात. त्यामुळे जगात जे काही भलेबुरे घडते ते या सगळ्याचा परिपाक असतो. या सर्व पात्रांपैकी इस्रायल समर्थक जे आहेत ते अर्थातच बव्हंशी ज्यु लोक असतात. ज्यु लोक अतिशय बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि धनवान आहेत. भारतात ज्ञान, साहित्य, कला, उद्योग, राजकारण या विषयांवर काही विशिष्ट समाजांची/जातींची जास्त पकड दिसते. परंतु एकच समाज चौफेर कामगिरी करताना सहसा दिसत नाही. अपवाद वेगळे. परंतु ज्यु समाज मात्र चौफेर प्रतिभावंत आणि यशवंत आहे. शास्त्रज्ञ, कलाकार, उद्योगपति, राजकारणी, विद्वान, तत्वज्ञ ... काय नाही आहेत ज्यु समाजात प्रश्न पडतो. हॉलीवुड मध्ये सुद्धा बरेच ज्यु कलावंत आणि त्याहुनही अधिक निर्माते आहेत.
९-१-१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये जे लोक मृत्यू पावले त्यात बव्हंशी ज्युच होते कारण वॉल स्ट्रीट वर देखील यशस्वी लोकांमध्ये ज्यु अग्रगण्य आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणुन इराक युद्धाचे ढोल जेव्हा वाजवले जाऊ लागले तेव्हा पारंपारिक डेमॉक्रॅट असणाऱ्या ज्यु समाजाने युद्धाबाबत रिपब्लिकनांना पाठिंबा दिला. या सर्वाचे प्रतिबिंब इथल्या प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रचारामध्ये तर उमटलेच पण अगदी चित्रपटसृष्टीदेखील त्यातुन सुटली नाही. पुढे वॉर ऑफ द वर्ल्ड सारखे अनेक चित्रपट निघाले जे परकियांविषयी द्वेष अथवा मत्सर निर्माण करतील. चित्रपट पाहणाऱ्याला वाटते की आपण एक काल्पनिक कथा पाहतो आहे. परंतु खरे तर कुठेतरी आपले ब्रेन-वॉशिंग (बुद्धिभेद) होत असते. अर्थात एका माणसाला जो बुद्धिभेद वाटेल दुसऱ्याला ती जागृति वाटू शकते. त्याला इलाज नाही. दुसऱ्या महायुद्धात गोबेल्सने अशी बरीच जागृति केली होती. परंतु महायुद्ध संपल्यानंतर लोकांना कळले की आपण फसवले गेलो आहोत. असो ... परंतु या भांडणात न अडकता फक्त हे स्वीकारावे की केवळ करमणुकीच्या पलिकडे जाऊन देखील काही उद्देश (राजकीय / सामाजिक / आर्थिक) काही माणसे चित्रपट बनवतात.
जेम्स कॅमेरॉन हा त्यातलाच एक.
परंतु एक नाही तर एकमेकाद्वितीयच. कारण असे की कॅमेरॉनने एकंदरीतच जगात सध्या जे अमेरिकेचे साम्राज्य पसरले आहे त्यावर अगदी उघड भाष्य केले आहे. मूल्यवान धातु आणि तो लुबाडण्यासाठी तयार असलेल्या कंपन्या आणि त्यासाठी युद्ध पुकारण्याची त्यांची तयारी.... जगभरात आणि अगदी अमेरिकेतही बऱ्याच लोकांना हे कळते आणि ते त्याला विरोध करतात देखील. परंतु मागच्या ८-१० वर्षात हा विरोध क्षीण वाटला आहे. इराक युद्धाच्या वेळी इतके उघड उघड खोटे आरोप करुन देखील कोणीही प्रमुख कलावंत, शास्त्रज्ञ अथवा पत्रकार यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला नाही. असतील तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. म्हणुन जेम्स कॅमेरॉनचे महत्व.
अवतार चित्रपटामध्ये दाखवलेली अनॉब्टेनिअम धातुची हाव ही केवळ एक प्रतिक आहे. वस्तुस्थिती ही आहे की अमेरिकेतील राहणीमान हे जगाच्या मानाने खूप कमालीचे वर आहे. ५% लोकसंख्या असलेला देश जगातील २५% उत्पादन वापरतो आहे. या सर्वासाठी जो कच्चा माल लागतो त्यावर नियंत्रण ठेवल्याशिवाय तो कच्चा माल योग्य किंमतीला मिळणार नाही. तेलावर असलेले नियंत्रण अगदी दिसते. परंतु अगदी दक्षिण अमेरिकेतील पाण्याची सरोवरे आणि जंगलांबरोबर आफ्रिकेतील आणि ऑस्ट्रेलिआतील खाणींपर्यंत हे नियंत्रण सर्वदूर पसरले असते. उगाच ५०-१०० विमानवाहु नौका आणि हजारो क्षेपणास्त्रे आणि विमाने तैनात केलेली नसतात. आर्थिक देवाणघेवाणीमागे राजकीय आणि शस्त्रांचे बळ आहे. उगाच का हवाई गुआम आणि भारताच्या दक्षिणेला दिएगोगार्सिआ, तसेच जपान, दक्षिण कोरिआ आणि आखात आणि युरोपमध्ये सैन्य तैनात केले? सुरक्षेचे कारण तितके खरे नाही आहे. अमेरिकेच्या सामर्थ्याला टक्कर द्यावी इतकी ताकत कोणातही नाही. आणि जरी असली तरीही जे थोडेफार बळकट आहेत त्यांना युद्ध हा पर्याय नाही हे कळते. त्यामुळे अर्थातच ही ताकत अमेरिकेच्या उद्योगजगताला भल्याबुऱ्या मार्गाने जगभरातुन कच्च्या मालावर पकड घेता यावी यासाठीच आहे.
आपण इतिहास विसरुन चालणार नाही. शेवटी ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी होती हे विसरुन चालणार नाही. आणि ती कंपनी इंग्लंडच्या राजाची हस्तक होती. आणि त्यांनी भारताच्या संपत्तेची प्रचंड लूट केली. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे दुष्काळ इंग्रजांच्या काळातच घडले. दुसऱ्या देशांना लुबाडुन स्वत: श्रीमंतीत राहणारे हे आधुनिक वाल्या कोळीच. आत्तासुद्धा तेच घडते आहे. फक्त फरक इतकाच आहे की आता जग एकमेकात इतके गुंतले आहे की राजसत्तेचा उद्योगविश्वावर तितका ताबा राहिला नाही आहे. पाश्चिमात्य देशांतील काही सुजाण नागरिकांना आणि संस्थांना हे कळत असते परंतु बव्हंशी नागरीक आपल्या रोजच्या जीवनात इतके दंग असतात की त्यांना या गोष्टींचा गंधही नसतो. जागतिकीकरणामध्ये नकळत कुठेतरी चांगल्या गोष्टी घडुन जातात कारण माणुस जातच मुळी समाजप्रिय आहे. जागतिकीकरणामुळे समाजाची व्याख्या आपले गाव, राज्य आणि देशाच्याही पलिकडे जात चालली आहे. आता हेच पाहा की एकप्रकारे अमेरिकी परराष्ट्र धोरण आणि उद्योगांवर इतकी उघड टीका करणार चित्रपट गेले दोन आठवडे इथे चित्रपटगृहामध्ये कमालीचा लोकप्रिय झाला आहे. १ अब्ज डॉलर्सच्या वर पैसे कमवले आहेत. एकंदरीत काय तर हे प्रश्न आपल्याला कळले पाहिजे परंतु त्यामध्ये कुठेही द्वेष करुन चालणार नाही कारण कोणाचा द्वेष करणार? दुर्बळांचा फायदा घेणारे लोक तुम्हाला कुंपणाच्या दोन्ही बाजुला सापडतील. तसेच मदत करणारे आणि बघेही दोन्ही बाजुला सापडतील. प्रश्न इतकाच आहे की आपली भूमिका काय आहे?
असो .. विषय गंभीर आणि खोल जरूर आहे. परंतु कधी तरी वाच मोठी झाल्यावर आणि तुला कळेल. कदाचित तुला पुढचे काहीतरी कळेल आणि म्हणशील बाबा काय बावळट होता. मला चालेल ! पण वाच हे नक्की.
6 comments:
सलोनी, तुझ्या बाबांनी खूप म्हणजे खूपच छान वर्णन लिहिलंय या चित्रपटाचं आणि सर्वात मुख्य म्हणजे त्याची दुसरी बाजू (जिची विशेष किंवा अजिबातच चर्चा झाली नाही अशी) पण अतिशय सुंदर रीतीने मांडली आहे. मी अजून हा चित्रपट बघितलेला नाही पण बघेन तेव्हा नक्की तुझ्या बाबांनी मांडलेल्या दृष्टीकोनातून बघेन.
heramb,
blogavar swagat! pratikriyebaddal dhanyavad. chitrapat chaanach aahe. 3D pahila tar adhik uttam!
Parag
मी चित्रपट पाहिला आहे.पण तुम्ही एका वेगळ्या कोनातुन बरीच माहिती देत छान उलगडुन दाखवलात.
Devendra
swagat! mhanunach mee mhatale kee te messaging supt asate. Kuthetari te register hote... pan te nantar kadhitari janavel. The only difference was that this time the messaging was from the other side.
General public (here or worldwide) may or may not have those lenses on but the newspapers here clearly understand the foreign policy and wouldn't miss the critique in the movie. That's why when the movie reached $1B collection worldwide, suddenly james cameron was reported as a notorious director and they showed a totally out of context clip to prove his notoriety. The clip was about his receiving oscar for titanic where he thundered "I am the king". Actually he was only repeating joyfully the sentence from the lead character in Titanic. But that's what it is ... teeka kelee .. aata tyalaa parinam bhogave laaganaar aahet.
khoop Chaan lihila aahe lekh...khupach chhan!!
Mugdha... blogvar swagat. Abhiprayabaddal dhanyavad. Utsah vadhala!
Post a Comment