सलोनीराणी,
२७ ऑगस्टला इथे फिनिक्समध्ये भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनाला पाठिंबादर्शक मेळावा झाला. सुदैवाने मीदेखील त्याच्या आयोजकांपैकी एक होतो. हे आंदोलन कुठे जाईल माहित नाही. परंतु त्यानिमित्ताने भ्रष्टाचाराला सोकावलेले आणि निमुटपणे सहन करणारे दोन्ही वर्ग खडबडुन जागे झाले ... हेही नसे थोडके.
फिनिक्सच्या आमच्या सभेची काही क्षणचित्रे...
अर्थात या मेळाव्याचे यश अण्णांच्या आंदोलनाचे आहे. आम्ही फक्त निमित्तमात्र. दगडाला शेंदुर लावला तर त्यालादेखील लोक नमस्कार करतात तसे.
अर्थात या मेळाव्याचे यश अण्णांच्या आंदोलनाचे आहे. आम्ही फक्त निमित्तमात्र. दगडाला शेंदुर लावला तर त्यालादेखील लोक नमस्कार करतात तसे.
एकंदरीतच मेळावा अगदी अनौपचारिक होता त्यामुळे २० एक लोकांनी त्यानंतर आपले कळकळीचे विचार मांडले. माझ्या ११ वर्षांच्या अनुभवात मी अमेरिकेत भारतियांची कुठल्याही विषयावर इतकी एकजुट पाहिली नव्हती आजपर्यंत. |
आणि सर्वात महत्वाचे माझ्या दृष्टीने ... सलोनीचे "मेरा भारत महान!" |