tag:blogger.com,1999:blog-1446939080989560508.post1011848161213782699..comments2023-07-06T08:36:49.720-07:00Comments on बाल-सलोनी: इंग्लंडच्या राणीची आयर्लंडवारीबाल-सलोनीhttp://www.blogger.com/profile/16086106890404283059noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1446939080989560508.post-83116546435200788142011-05-23T08:15:12.395-07:002011-05-23T08:15:12.395-07:00नानिवडेकरजी अभिप्रायाबद्दल धन्यवाद. वेगळे विचार मा...नानिवडेकरजी अभिप्रायाबद्दल धन्यवाद. वेगळे विचार मांडता आपण.

सर्वप्रथम मी एक सामान्य पोटभरु माणुस आहे. कोणी अभ्यासु विचारवंत नाही. त्यामुळे या विषयातला तज्ञ नाही. मला जे समजते ते स्वैर विचार आहेत इतकेच काय. काही चुकेचे असतीलही. आणि कोणी चुक दाखवली तर आनंदच आहे.

आपन म्हणता ते बरोबर आहे. शिस्त हे वेगळे वैशिष्ट्य म्हणुन नाही तर आवश्यक गुणधर्म म्हणुन सांगितले! सर्व गोरा समाजच शिस्तप्रिय आहे.

पाळेमुळे कशी पसरली आहेत? तर अप्रत्यक्ष रित्या. याचा अर्थ असा नाही की राणि महालामध्ये बसुन जगाच्या घडामोडी घडवते आहे. परंतु त्यांना इंग्लिश जनता पोसते आहे म्हणजे अजूनही निष्ठावंतांची संख्या भरपूर आहे ज्यांना राजघराणे असावे असे वाटते.

नविन धर्मांच्या मागे तत्वज्ञान नाही कसे? आहेच मुळी. परंतु मतभेत तात्विक नाहीत. मतभेदांची मुळे कर्मकांडापेक्षा सत्तासंघर्षात असावीत असे माझे मत आहे. का? कारण सर्व २४ तिर्थंकर, १० गुरु आणि बुद्ध स्वत: क्षत्रिय होते. अकबराला काय वेळ जात नव्हता तेव्हा त्याने दीन-ए-इलाही काढला! सेम विथ चर्च ओफ़ इंग्लंड! आपल्याकडे परशुरामाला पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय का करावी लागली? त्यानंतर राम येतो आहे परशुरामाचा पराभव करतो ... इतकेच नाही तर व्हिलन रावण ब्राह्मण आहे! यातुन संघर्ष दिसुन येतो. इतकेच काय तर चाणक्याने नंद घराण्याचा पराभव केला तेव्हा घोषणा केली - "नन्दांतम क्षत्रिय कुलम". तर हा संघर्ष आहे. त्याला तत्वाचे अधिष्ठान देणारे देतील. आजदेखील अमेरिका दहशतवादाविरुद्ध चा लढा "इव्हिल" विरुद्धचा लढा आहे हे आवर्जुन सांगते!

परंतु जे देश आज प्रगत आहेत त्यांनी धर्म मुठीत ठेवला आहे ही वस्तुस्थिती आहे. अमेरिकेतील फार राईट चा उदय ही अमेरिकेच्या अस्ताची नांदी आहे.

असो ... पुरे अजुन काही नंतर लिहिन!बाल-सलोनीhttps://www.blogger.com/profile/16086106890404283059noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1446939080989560508.post-66010517570078723122011-05-23T01:49:21.382-07:002011-05-23T01:49:21.382-07:00श्री पराग जगताप: ठोकळ निष्कर्ष काढायला माझी हरकत न...श्री पराग जगताप: ठोकळ निष्कर्ष काढायला माझी हरकत नाही. पण काही मुद्दे बरोबर मांडलेच नाहीत, असे मला वाटते. चंगीज़ खाँ आणि शिवाजी यांचा ज़ो शिस्तीबाबत उल्लेख झाला तिचा ब्रिटिश राजघराण्याशी काय संबंध आहे? ते लोक शिस्तप्रिय आहेत, असे म्हणतात. सगळा गोरा समाज़च एकूण शिस्तप्रिय आहे. त्याचे श्रेय या घरण्याला कसे ज़ाते?

आर्थिक, तांत्रिक इत्यादि सत्ताकेन्द्रांत या घराण्याची पाळेमुळे कशी पसरली आहेत? पैशासाठी हे लोक सरकारवर अवलंबून आहेत. आणि प्रचारमाध्यमांचा या घराण्याला भयंकर त्रास झाला आहे.

नवीन धर्मांच्या उदयामागे तत्त्वज्ञान नाही, हा निष्कर्ष कशावरून काढला? बुद्धाला कोणती सत्ता हवी होती? मुसलमान देशांत सत्ताधीशांनी धर्म मुठीत ठेवला आहे, की धार्मिक सत्ताकेन्द्रांचा त्यांच्यावर वचक आहे? आज़ युरोपात धर्म सत्ताधीशांच्या मुठीत आहे, की लोकांनी तो झुगारून दिलेला आहे?

ब्रिटिशांच्या शिस्तीचे आपण खूप कौतुक करतो, आणि ते रास्तही आहे. विशेषत: भारतीयांच्या बेशिस्तीपुढे ती शिस्त उठून दिसते. ते लोक मात्र स्वत:विषयी म्हणतात: 'The British created an empire in a fit of absent-mindedness'.

- नानिवडेकरNaniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1446939080989560508.post-27990704765477732842011-05-23T00:52:27.167-07:002011-05-23T00:52:27.167-07:00मंगेशजी धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत. तोडके मोडके वि...मंगेशजी धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत. तोडके मोडके विचार आहेत. तुम्हाला आवडले हे वाचुन बरे वाटले. अग्रेषित शब्द मला आज मिळाला! त्याबद्दल धन्यवाद!बाल-सलोनीhttps://www.blogger.com/profile/16086106890404283059noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1446939080989560508.post-14209242920147004482011-05-23T00:26:45.601-07:002011-05-23T00:26:45.601-07:00आपण लिहिलेला लेख आवडला. अत्यंत डोळस विचार आणि इतिह...आपण लिहिलेला लेख आवडला. अत्यंत डोळस विचार आणि इतिहासाची सफर त्यातून घडली. असा लेख नुसता अनुदिनीवर काही वाचकांनी वाचणे योग्य नाही. एखाद्या वृत्तपत्राच्या रविवार अंकात तो शोभून दिसेल. आपली परवानगी गृहित धरून हा लेख माझ्या मित्रांना अग्रेषित करत आहे. अर्थात आपल्या अनुदिनीच्या संदर्भासह.
मंगेश नाबर.mannabhttps://www.blogger.com/profile/15475762165895534177noreply@blogger.com